
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगरात किराणा दुकानात बसलेल्या एका वृध्द महिलेला चहाचा मसाला घेण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी १४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवार १५ जुलै रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशीकी, जळगाव शहरातील निवृत्ता नगरात प्रमिला पुंडलीक पाटील वय ६० या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. घराच्या दुकानाच्या समोर किरणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी १४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता प्रमिला पाटील या महिला दुकानावर बसलेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी दोन जण किराणा दुकानावर येथून चहा मसाला मागण्याचा बहाणा करून वृद महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीचे सोन्याची चैन चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी प्रमिला यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.



