Home क्राईम जळगावात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धूम स्टाईल लांबवली

जळगावात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धूम स्टाईल लांबवली

0
37
chain snatching


 

chain snatching 1454350449 835x547

जळगाव प्रतिनिधी | प्रवचनासाठी जात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याची पोत धूम स्टाईल लांबवल्याची घटना आज दुपारी गणेश कॉलनी परिसरात घडली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार दुर्गाबाई दिनकर चौधरी (वय- 75, रा. चंद्रप्रभा कॉलनी, गणेश कॉलनी परिसर जळगाव) या घरापासून जवळच असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात प्रवचनासाठी आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी रस्त्यावर उभे असलेले दोन अज्ञात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यात असलेली अडीच तोळ्याची सोन्याची पोत ओढून दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी या वयोवृद्ध महिलेने आरडाओरडवर केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. परंतू तोपर्यंत दोघे भामटे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound