जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शतपावली करण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी जबरी तोडून पसार झाल्याची धक्कादायक घटना व्यंकटेश मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कला नरेंद्र भंसाली (वय-६६) रा. बालाजी पार्क, व्यंकटेश मंदिराच्या जवळ, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बुधवारी १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या घराच्या बाहेर शतपावली करण्यासाठी निघाल्या. त्यावेळी अज्ञात चोरटा जवळ येवून त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम सोन्याची चैन गळ्यातून जबरी हिसकावून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत महिलेने आरडाओरड केली परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याबाबत गुरुवारी १४ एप्रिल रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.