जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव शिवारातील शेतातील गट नंबर ९९० मध्ये अचानक लागेलल्या शेतातील आगीत चारा जळून खाक झाल्याची घटना रविवार २४ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजता घडली. याबाबत सकाळी १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, कोमल शशिकांत सपकाळे वय-३३, रा.कडगाव ता. जळगाव यांचे कडगाव शिवारातील गट नंबर ९९० मध्ये शेत आहे हे शेतात त्यांनी गुरांचा चारा ठेवला होता. दरम्यान रविवार २४ मार्च रोजी रात्री २ वाजता शेतातील चाराला अचानक आग लागल्याने ४० हजार रुपयांची नुकसान झाले आहे. याप्रकरणी सकाळी १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहे.