Home Cities पाचोरा नांद्रा येथे कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण

नांद्रा येथे कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण


6cca84f9 cbe4 4dd9 937c 7dee90cb2af8

कुरंगी (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात आज कामगार दिन व महाराष्ट्र दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील ग्राम पंचायतीने ध्वजारोहण करण्याचा मान सफाई कामगार अशोक मदनजी आदिवाल यांना देवून त्यांचा अनोखा सन्मान केला.

 

तसेच नांद्रा येथील तलाठी कार्यालयातही कामगार कोतवाल मुरलीधर लक्ष्मण निकम यांच्या हस्ते तर प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील जेष्ठ कामगार म्हणून दिलीप नथ्थु पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पी.एस. पाटील न्यु इंग्लिश स्कुल मुख्याध्यापक गरुड यांनी तर मराठी शाळेत मुख्याध्यापीका मँडम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच शिवाजीराव तावडे, बापू सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, हिरालाल पाटील, गोटू साळवे, बालू बाविस्कर, संजय पाटील, पत्रकार नगराज पाटील, मंडळ अधिकारी मोरे, ग्रामसेवक सतिश सत्रे, तलाठी, आरोग्य अधिकारी बुद्धभुषण पवार, पाटील मँडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound