Home धर्म-समाज भुसावल मंडलातील प्रथम महिला कुलीचा सत्कार

भुसावल मंडलातील प्रथम महिला कुलीचा सत्कार

0
60


 

भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात प्रथम महिला कुलीची रेल्वे प्रबंधक विवेक गुप्ता आणि मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक रेल्वे स्थानकावर नियुक्तीत करण्यात आली.त्यांचा मुख्य कार्यलयात सत्कार करण्यात आला.

पांडुरंग कचरू मानकर यांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कामकाज करण्यास असमर्थ ठरविण्यात आले होते. त्यांच्या जागी त्यांची वारस असलेली त्यांची विधवा मुलगी इंदू एकनाथ वाघ हिस प्रचलित नितिनिर्देसानुसार नियुक्त करण्यात आले आहे. इंदू वाघ यांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर लायसेन्स पोर्टर च्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. वाणिज्य विभागातर्फे भुसावळ मंडळात प्रथम महिला कुली बनल्याने त्यांचा मुख्य कार्यालय अधीक्षक योगेश नागरे यांनी सत्कार केला.


Protected Content

Play sound