भारत- चीन दरम्यान पाच कलमी शांतता फॉर्म्युला

नवी दिल्ली -लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहे. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात २ तासांहून अधिक वेळ द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पूर्व लडाखमधील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान पाच कलमी योजनेवर सहमती दर्शवण्यात आली. यात सीमेसंदर्भातील सर्व करार आणि प्रोटोकॉलचे पालन करणे, शांतता राखणे आणि कोणतीही कारवाई टाळणे आदी मुद्यांच्या समावेश आहे.

यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या संख्येने चिनी सैनिक तैनातीवर भारताकडून सवाल उपस्थित करण्यात आले. चीनचा हा प्रयत्न १९९३ आणि १९६६ च्या कराराचे उल्लंघन आहे. भारताच्या या सवालावर चीनच्या बाजूकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content