चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मामलदे, वर्डी , हरेश्वर नाला, नागलवाडी, या ठिकाणी चोपडा पिपल्स बँक लि. सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भारतीय जैन संघटना व लोकसभागातून नालाखोलीकरणाचे काम करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात त्या नाल्यांंमध्ये लाखो लिटर पाणी साठले. यानिमित्त गावकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी प्रा.अरुणभाई गुजराथी याच्या हस्ते साडीचोळी,नारळ टाकून विधिवत पूजा व जलपूजन केले.
यावेळी चोपडा पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी , उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, संचालक सुभाष गुजराथी, संचालक नेमीचंद जैन, संचालक डॉ. नरेंद्र शिरसाठ, निसर्ग प्रेमी सागर बडगुजर भारतीय जैन संघटनाचे तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडीया, विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, तसेच मामलदे गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मामलदे येथे खालचा नाला व वरचा नाला या दोन नाल्यात खोलीकरण करण्यात आले होते. या दोघं नाल्यात लाखो लिटर पाणी साठवण झालेले आहे. या नाल्यांची १५ ते २० फूट खोल रुंदी- १५ फूट असून लांबी जवळपास २०००फूट नालाखोलीकरण झालेले आहे. या एका -एका नाल्यात लाखो लिटर पाण्याची साठवणूक झालेली आहे. या नाल्याचे पाणी काही प्रमाणात जिरवन झाले आहे. भविष्यात परिसरातील जवळपास २ ते ३ किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतीला फायदा होईल, असा अंदाज आहे.
गावाची सामाजिक बांधिलकी
नाल्यात काम सुरू असतांनाच गावातील विलास रघुनाथ पाटील यांचा चिरंजीव पवन विलास पाटील ( वय -२१) यांचे अकस्मात निधन झाले होते. पवनच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत होती. होतकरु ,मनमिळाऊ, हसमुख, स्वभावाचा पवन गेल्याने गावातील मंडळीने विचारविनिमय करून आपणास पवनची सदैव आठवण येईल, या उद्देशाने खालच्या नाल्यावर जो ही बंधारा तयार होईल. त्याला पवन बंधारा नाव देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच वरच्या नाल्यावर काम करण्यासाठी अवधूत महाजन ,बालमुकुंद महाजन या दोघांनी पुढाकार दाखवत आर्थिक मदतही केली. या कामात भरत इंगळे, पुडलिंक पाटील, राजेन्द्र पाटील, शांताराम पाटील, विजय पाटील,सतिष पाटील, चंपालाल पाटील,प्रविण पाटील, विनोद पाटील अनिल पाटील, रघुनाथ पाटील,रविंद्र पाटील, निखिल महाजन, प्रल्हाद पाटील, या सर्वांनी पुढाकार घेऊन या दोघे नाल्याचे काम करून घेतले. आज हे दोघे नाले पाण्याने भरले. तर गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत चोपडा पिपल्स बँक व भारतीय जैन संघटनेचे तोंड भरून कौतुक केले. पुढच्या वर्षीही आम्हाला अशाच पध्दतीने मदतीचा हात दया, असे येथील शेतकऱ्यांनी प्रा अरुणभाई गुजराथी ,चंद्रहासभाई गुजराथी यांच्यासह सर्व संचालकांना विनंती केली. या भरलेला बांधरामुळे मामलदे परिसरातील शेतीला मोठी मदत मिळणार आहे. गावाच्या पिण्याचा पाण्याला देखील मोठी मदत होणार असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले.