जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना पक्षाने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत चार आमदार निवडून आले होते. तर अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील शिवसेनेला पाठींबा दिला होता. यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश घेतला. या पार्श्वभूमिवर, आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात जळगावतील पाच मान्यवरांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेने जळगाव ग्रामीण मतदारसंघात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना उमेदवारी प्रदान केली आहे. यासोबत एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील, पाचोऱ्यातून किशोरआप्पा पाटील, चोपड्यातून प्रा. चंद्रकांत सोनवणे तर मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेने कोणताही धोका न पत्करता अपेक्षित उमेदवारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. यात एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जागेवर त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना तर चोपड्यातून लताताई सोनवणे यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.