Home राजकीय काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 20 सप्टेंबरला होणार जाहीर

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी 20 सप्टेंबरला होणार जाहीर

0
35


Balasaheb thorat news
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रूममध्ये आज बैठक झाली. त्यानुसार आजच्या बैठकीत जवळपास 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला. पहिल्या 50 उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

 

बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते सहभागी झालेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जागावाटप पूर्ण झाले असून प्रत्येक दोन्हीही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढविणार असून मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडणार आहेत. राज्यातली बदलती समिकरणं लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे आज राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली असून निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन टाकली आहे.


Protected Content

Play sound