जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील पी.ई. तात्या चामुंडा मेडीकल काँलेज येथे आज ६० वर्षेवरील ४० नागरीकांना पहीला डोस देण्यात आला.
यावेळी विशेष सहकार्य चेअरमन राहुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी चेतन अग्निहोत्री, आरोग्यसेवीका राजश्री वाणी, आरोग्य सेवक, पंकज तायडे, गटप्रवर्तक सुरेखा साळुंके, आशा सेवीका माया पाटील, वंदना, शैलेश साळुंके यानी परीश्रम घेतले व सहकार्य केले.
मागील दोन महिन्यांपासुन कुंसुंबा येथे लस केंद्र मिळावे व लसीकरण व्हावे यासाठी तालुका काँग्रेस चे प्रमोदभाऊ घुगे यांनी चव्हाण साहेब, अग्निहोत्री साहेब यांच्या कडे पाठपुरावा केल्यानंतर आज ४० डोस उपलब्ध झाले व यापुढे नियमितपणे डोस उपलब्ध झाल्यावर लसीकरण करण्यात येईल हा शब्द डॉ. संजय चव्हाण साहेबांच्या कडुन देण्यात आला. त्याबद्दल सर्व नागरीकांनकडुन आज सर्व कर्मचाऱ्यांचे आभार माणण्यात आले.