Home क्राईम भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाला बदडले; एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाला बदडले; एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । काकाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बापलेकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सुभाषवाडी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अनिल प्रेमराज राठोड (वय-२९) रा. सुभाषवाडी ता. जि.जळगाव यांच्या काकाला गावातील तुळशीराम परशूराम राठोड, परशूराम गजमल राठोड, सिताराम चत्रु राठोड आणि शालीक सिताराम राठोड चौघे रा. सुभाषवाडी हे शिवीगाळ व मारहाण करत होते. हे पाहून अनिल राठोड आणि त्याचे वडील प्रेमराज सरदार राठोड भांडण सोडविण्यासाठी गेले असतान त्यांना देखील चौघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.


Protected Content

Play sound