नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या सर्वात वेगवान ट्रेनमध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला आहे. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असतानाच हा बिघाड झाला. वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीला आणले जात होते. यावेळी ट्रेनचे इंजिन फेल झाले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. दरम्यान एक्स्प्रेसमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाही. उत्तर प्रदेशातील टुंडला स्थानकापासून १५ किलोमीटरवर ही घटना घडली. भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित ‘ट्रेन-१८’ (Train 18) किंवा ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी हिरवा झेंडा दाखवला होता. यापूर्वी भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेचे पंतप्रधान मोदींनी निरिक्षण केले आणि हिरवा कंदील दाखवून एक्सप्रेसचे उद्घाटन केले होते. ट्रेन पूर्णपणे बंद पडण्याआधीच ट्रेनच्या मागील डब्यातून काही आवाज येत होते. संशय आल्याने लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला. मागील चार डब्यांमधून धूर आणि विचित्र वास येत होता. यानंतर चाकांमध्ये अडचण येऊ लागली आणि शेवटच्या डब्याचे ब्रेक जाम झाले. उत्तर प्रदेशातील टुंडा जंक्शनपासून 15 किमी अंतरावर हा प्रकार घडला. इंजिनिअर्सनी 10 किमी ताशी वेगाने ट्रेन पुन्हा सुरु केली होती. पण नंतर ट्रेन थांबवावी लागली.