मुंबई प्रतिनिधी । मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील घाऊक महागाई दराच्या आकडेवारीनंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या तेजीचे वारे सोमवारी थांबले आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स ७७.९९ अंकांच्या घसरसणीसह ४०९३८.७२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३२.७५ अंकांची घसरण झाली. निफ्टी १२०५३.९५ वर बंद झाला.
सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी सकारात्मक सुरुवात केली होती. सेन्सेक्स आणि बँक निफ्टीने उचांकी स्तर गाठला होता. निफ्टीवर ग्रासिम इंडस्ट्रीज, अदानी पोर्टस, जेएसडब्लू स्टील, आयटीसी आणि आयशर मोटर्स या शेअरमध्ये घसरण झाली. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी या शेअरमध्ये वाढ झाली. मेटल, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा या क्षेत्रात घसरण झाली. तत्पूर्वी सेन्सेक्सने १७५ अंकाची वाढ नोंदवत ४१ हजार १८५.०३ अंकांचा सार्वकालीन विक्रमी स्तर गाठला होता.