पाचोरा, प्रतिनिधी | येथील कृषी अधिकारी यांच्या दालनात आत्मा योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा सन्माननीय सदस्य व सदस्यांचा सत्कार सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते येथील शिवसेना कार्यालयात आज (दि.२६) दुपारी ३.०० वाजता उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले की, आपण शेतीची मनापासून आवड असलेले जाणकार शेतकरी आहात, आपणास शेती करताना येणाऱ्या अडचणी व समस्यांची जाण आहे म्हणून शासनाच्या शेतकरी कल्याणकारी योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे सत्कर्म करा. शेतकरी हिताचे निर्णय घेऊन तालुक्याची प्रगती करा व शेतीचे महत्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.
यावेळी अध्यक्ष अरुण काटकर, विजय वाणी, रवी गिते, अनिल पाटील, गोपाल पाटील, दत्तू जयसिंग जाधव, डॉ. शामकांत पाटील, अदवैत येवले, रमेश बाफना, राजेंद्र परदेशी, बाळासाहेब पाटील, गुलाल पवार, राजेंद्र पाटील, रामदास देशमुख, वसंत गायकवाड, सौ.सुरेखा भिकनसिंग राजपूत, सौ.जनाबाई प्रकाश पाटील, सौ.कल्पना कन्हैयासिंग परदेशी, सौ.विजया तुळशीदास पाटील, सौ.रोहिणी रामकृष्ण पाटील, सौ.संगीता त्र्यंबक पाटील, सौ.रोहिणी ज्ञानेश्वर पाटील, अरूणाबाई राजेंद्र पाटील, सौ.अनिता विष्णू पवार, गणेश पाटील, अविनाश कुडे, राजू राठोड, ज्ञानेश्वर पाटील, तुळशीदास पाटील, विशाल राजपूत, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत नितीन पाटील, दीपक पाटील जारगाव, विजय बाबूलाल, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ शेतकरी विजय वाणी व राजेंद्र परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन आणि प्रास्ताविक नाना वाघ यांनी केले.