हैदराबाद (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच 12 आमदारांनी दिल्यामुळे तेलंगणात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे 120 पैकी 91 जागांचे बहुमत आहे. तर एमआयएम 7 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत. काँग्रेसच्या 19 पैकी 12 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पोचराम श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे जाऊन काँगेस विधीसंमडळ पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस प्रदेश समितीनेही नुकतेच आमदार रोहित रेड्डी हे राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसच्या 12 आमदारांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्याने आता काँग्रेसकडे 6 आमदारांचे संख्याबळ राहिले आहे.