जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी जळगाव शहरातून हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी तुकाराम परिसरातून लोखंडी तलवारसह रात्री ११ वाजता हनुमान मंदिर परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन उर्फ टिचकूल कैलास चौधरी रा. हनुमान नगर, तुकाराम वाडी जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सचिन टिचकून कैलास चौधरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २ असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावरती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान हद्दपार असताना देखील तो जळगाव शहरातील हनुमान नगर मंदिर परिसरात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुरुवार ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत गुन्हेगार सचिन उर्फ टिचकून कैलास चौधरी याचा अटक केली. त्याच्याकडून तलवार हस्तगत केली आहे. ही कारवाई कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाडे, पोलीस नाईक योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे यांनी केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.