खामगाव अमोल सराफ । कोरोना काळात थकबाकी असलेल्या विजग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाढत असलेले विज थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, खामगाव विभागीय वीज वितरण कार्यकारी अभियंता बद्रिनाथ जायभाये यांनी लोणार उपविभागीय विभागातील वीज वितरण ग्रामपंचायत, शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधून महावितरणच्या विविध योजना संदर्भात माहिती दिली आहे.
त्यातच आता फक्त थेट संवाद ग्राहकांचे तक्रारीचे निराकरण व प्राप्त झालेले महावितरणचे वीज बिले ग्राहकांकडून समान हप्त्यांमध्ये भरून घेणे हात एक पर्याय सध्या महावितरण समोर आहे. त्यातच ग्रामीण भागात ग्रामपंचायत पर्यंत जाऊन आज खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लोणार उपविभाग आला भेट देत. त्या अंतर्गत येणारे ग्रामपंचायतीला भेटी देत थेट ग्राहकांना शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना महावितरणच्या विविध योजनांबाबत अवगत करीत व वीज ग्राहकांना थकीत बिलाचे समान हप्ते वीज बिलाचे करून दिले आहेत. ते सांगत मागील दहा महिन्यापासून विशेषता थकबाकी असलेल्या ग्राहकांना मुख्य विज भरण्याच्या प्रवाहात आणण्याकरता धडाडीची मोहीम सुरू केली आहे.
त्यामुळे आता विज कापणे न करता ग्राहकांची वीज देखील सुरळीत राहील व वीज वितरण चा गाडा देखील हाकला जाईल याकडे खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय यांच्यासह सहायक अभियंता वडतकर व त्यांचे संपूर्ण चमू आज थेट ग्राहकांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन जनजागृती करून विज बिल भरण्याकरता एक अभिनव अशी मोहीम हाती घेतली आहे त्याला आता येणाऱ्या काळात समजेल की ग्राहक किती प्रतिसाद देतात व त्यांच्या हाकेला व देता व वीज वितरण सुरू केलेली ही थेट-भेट किती सुसंवाद राखत ग्राहकांच्या मार्फत विज बिल भरून परतफेड करते हे येणारा काळात समजेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पण एकंदरीत जी यंत्रणा यंत्रणा वीज तोडणी करता ग्राहकांच्या करता गावोगावी दिसून येतो होती. आता वीज न तोडता फक्त थकित वीज भरण्याकरिता ग्राहक एक संधी देत शेतकरी वर्गांना एक प्रकारे प्रबोधन करून त्यांना मुख्य वीज भरणा प्रवाहात आणणारा हे कौतुकास्पद आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.