रावेर येथे दत्तजयंतीनिमित्त रथ व पालखीसाठी चोख बंदोबस्त

 

रावेर, प्रतिनिधी | येथे उद्या (दि.१३) दत्त जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या रथ व पालखीच्या मिरवणुकीसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी फैजपूर डिव्हिजिनमधून Rcp प्लाटून-२८मागवण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन अधिकारी, २८ कर्मचारीअसतील. तसेच रावेर येथील २० पोलीस कर्मचारी, तीन अधिकारी व ४९ होमगार्ड यांच्यासह एकूण- चार अधिकारी, १२५ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात असेल.

 

पोलिसांनी नागरिकांना महत्वाची सूचना
केली असून म्हटले आहे की, रेवडी हा दत्त महारांजाचा प्रसाद आहे, त्यामुळे कुणीही घरावरून रेवडी फेकून मारू नये, प्रसादाची अवहेलना करू नये, प्रसाद देणाराला त्याचे हातातच द्यावा. रेवडी वरून फेकून मारलेने किंवा फेकलेने कोणाचे डोळ्यावर लागून किंवा शरीराचे इतर भागावर लागून इजा होऊ शकते. दत्त मिरवणुकी दरम्यान शांततेत दर्शन घ्यावे, एकदम गर्दी करू नये. स्त्रियांना प्रथम दर्शन करू देणे, गर्दी होऊन कोणाला धक्का लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे. कोणीही मोठी पुंगी कोणाचेही कानाजवळ वाजवू नये, कोणताही जुगार सोरट, चक्री, गुलगुली, झंनामंना खेळू नये, दिसून असल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहरातील शांतता अबाधित राहील, यासाठी प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे
.

Protected Content