नऊ तारखेला सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार : गिरीश महाजन

Girish

 

नाशिक (वृत्तसंस्था) सरकार स्थापनेविषयी नऊ नोव्हेंबरपर्यंत कालावधी आहे. त्यामुळे फारशी काळजी करण्याचं कारण नाही. ९ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होईल. त्या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. कोणताही वाद राहणार नाही. सरकार स्थापनेचा निर्णयही तेव्हाच होईल, असा दावा भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

 

अवकाळा पावसाने मराठवाडा, विदर्भासह नाशिक जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, मुख्यमंत्री एकटे नाहीत. आमचे पक्षाचे टिमवर्क आहे. मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेते आहे. आमची समिती कार्यरत आहेत. सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या घडामोडीत मुख्यमंत्री एकटे नाहीत. पक्ष त्यांच्यासोबत आहे. मी स्वतः दिवाळीत आठ दिवस मुंबईतच होतो. सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत. सध्या आमची भूमिका वेट अॅण्ड वॉच अशी आहे. चित्र लवकरच स्पष्ट होईल,” असंही ते म्हणाले.

Protected Content