भुसावळ, प्रतिनिधी । येथील प्रहार या संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संविधान आर्मीमध्ये भीमालाय जनसंपर्क कार्यालय येथे जगन सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
6 जून रोजी प्रहार या संघटनेचे व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जळ्गाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असंख्य प्रहार सेवक यांच्यासह संविधान आर्मी या संघटनेत आज भुसावळ येथील भीमालय जनसंपर्क कार्यालय येथे सविधान आर्मी राष्ट्रीय चिफ जगन सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी सविधान आर्मी उत्तर महारास्ट्र प्रमुख राकेश बग्गन, प्रहार अनाथ संघटना उपजिल्हाध्यक्ष संघपाल किर्तीकर, प्रहार अनाथ संघटना तालुकाध्यक्ष भूषण पिंगले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संविधान आर्मी चिफ जगन सोनवणे म्हणाले की, आज देशा पुढे खुप मोठे संकट आहे. आज संविधान धोक्यात आहे. आज obc/sc/st/nt/यांचे आरक्षण सुद्धा धोक्यात आहे. आज देश खाजगीकरणमुळे धोक्यात आहे. अशा वेळी सर्व 135 कोटी संविधानवादी भारतीय जनतेने सविधान आर्मी या संघटनेत युवकांनी सहभागी व्हावे. यावेळी प्रवेश करतांना संघपाल किर्तीकर म्हणाले की, संविधान धोक्यात असल्यानेच आम्ही प्रहार संघटना सोडून संविधान आर्मी त प्रवेश केला आहे. आता संविधानवादी शक्ती एकत्र करुन देश मजबूत करायचा आहे. आता संविधान आर्मी शिवाय पर्याय नाही.
तसेच यावेळी सविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गंन म्हणाले की, आता गट तट विसर्जित करुन सर्व विखुरलेल्या व सर्व जाती धर्मीय यांनी सविधान आर्मी त सामिल व्हावे, तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ही प्रवेश केला आहे.