Home Cities जळगाव सकल जैन समाजाचे श्री सामूहिक वर्षी तप महोत्सवाचे आयोजन !

सकल जैन समाजाचे श्री सामूहिक वर्षी तप महोत्सवाचे आयोजन !

0
201


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील सकल जैन समाजातर्फे शहरातील दादावाडी जैन मंदिरात श्री सामूहिक वर्षी तप महोत्सवाचे आयोजन रविवारी २१ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या महोत्सवात ७५ ते ८० जैन बांधव कठोर वर्षीतप साधना करत आहेत. यावर्षीचे वर्षीतपाचे लाभार्थी म्हणून महेंद्र अजयराज कोठारी आणि मदनलालजी मुथा हे दोन परिवार आहेत, ज्यांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी होत आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत.

जैन धर्मातील वर्षीतप हे एक अत्यंत कठीण व्रत मानले जाते. या व्रतामध्ये साधक एका दिवसाआड भोजन करतात. अशा प्रकारे सलग १३ महिने व १३ दिवसांच्या काळात म्हणजेच ४०० दिवस हे तप केले जाते. या तपामुळे साधकांना शारीरिक व आत्मिक शुद्धी मिळते, असे मानले जाते. परंतू आता ४०० दिवसांच्या ऐवजी सामुहिक पध्दतीने तप करण्यासाठी २००-२०० प्रमाणे दोन टप्पे करण्यात आले आहे. यावर्षी मोठ्या संख्येने उपासकांनी या सामूहिक तपामध्ये सहभाग घेतला आहे, ज्यामुळे समाजातील धार्मिक एकजूट आणि श्रद्धेची भावना दिसून येते.

या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून राजेश ललवाणी उपस्थित होते. त्यांनी तप करणाऱ्या सर्व साधकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कठोर व्रताची प्रशंसा केली. या कार्यक्रमाचे आयोजक अशोक श्रीश्रीमाळ यांनी या तपामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या वर्षी तप महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या साधकांना समाजातील विविध घटकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. या कार्यक्रमामुळे केवळ आध्यात्मिक वातावरणच नव्हे, तर सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना देखील वाढीस लागली आहे. हा महोत्सव जळगावच्या जैन समाजात एक नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन आला आहे.


Protected Content

Play sound