जळगाव, प्रतीनिधी | शहरातील राम मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नारखेडे वाड्या शेजारील चार घरांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पडले. ही घरे महापालिकेच्या खुल्या भूखंडावर बांधण्यात आली होती. तसेच ती जीर्ण झाल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबी च्या सहाय्याने पाडले.
शहरातील रथ चौक परिसरातील नारखेडे वाड्याजवळ असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर पाच घरे बांधण्यात आली आहेत. यापैकी ज्या घरांना चाळीस ते पन्नास वर्षे पूर्ण झाली असून ही गरज जीर्ण झालेली होती. या घरांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, संबंधित घरमालकांनी न्यायालयाचा धाव घेतली असता या कारवाईला स्थगिती आणली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात कामकाज झाल्यानंतर न्यायालयाने शनिवारी कारवाईची स्थगिती उठवली. आज आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पाच पैकी चार घरे जेसीबीच्या साह्याने पाडली. तर एक घर चांगल्या स्थितीत असल्याने महापालिका प्रशासनाकडून या घराला सील करण्यात आले आहे. बांधकामे पाडत असताना आयुक्त उदय टेकाळे यांनी पाहणी केली. चांगल्या स्थितीतील या घरात एखाद्या विभागाचे कार्यालय सुरू करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.