उद्या निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा जम्मू-कश्मीर दौरा

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग दोन दिवस जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी हे शिष्टमंडळ श्रीनगरला पोहोचणार आहे. सकाळी सव्वा अकरा वाजता प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

निवडणूक आयोग 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या वर्षी जूनमध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतदार यादी अद्ययावत करण्याचे आदेश जारी केले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासित प्रदेशात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा परत करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

 

Protected Content