जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे ८ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदी यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच खळाळून वाहत आहे. मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सकाळी ९ वाजता १६ दरवाजे हे आर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. सकाळी पाणीसाठा हा २०९.९१० मिमी होता. या १६ दरवाज्यातून ४३२.०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग झाला आहे. दुपारी २.३० वाजता ८ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. धरणाचा एकूण साठा हा १८२.४० क्युसेक्स इतका आहे. तापी नदीवर असलेलं हतनूर धरण हे जळगावातील एक मुख्य धरण आहे. येथून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, यावल, बोदवड, रावेर या तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरण ओसंडून वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.