चुरीचे पोते घेणारा ट्रक पलटल्याने चालक जखमी

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चुरीचे पोते घेऊन जाणारा टाटा आयशर पलटी होऊन चालक किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी संपूर्ण रस्त्यावर बांधकामात वापरली जाणारी चुरी पसरल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना ६ जून रोजी दुपारच्या सुमारास साखरखेर्डा ते मेहकर रस्त्यावरील गुंज फाट्याजवळ घडली.

साखरखेर्डा येथून (क्र. एमएच २० ईएल ५४१९) चे आयशर वाहन बांधकामात वापरल्या जाणाऱ्या चुरीचे पोते घेऊन मेहेकरकडे जात होते. यावेळी अचानक वाहनासमोर रोही आडवा आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी बराच वेळ वाहतूक ठप्प पडली होती. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन आणि रोडवर पसरलेली चुरी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Protected Content