फैजपूर प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालय आणि नव्याने सुरू होत असलेल्या 50 बेडच्या ऑक्सिजन कोविड सेंटरची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी आज पाहणी केली.
यावेळी उपस्थित असलेले आ शिरीष चौधरी यांनी नव्याने सुरू होत असलेल्या 50 बेडच्या कोविड सेंटरसाठी त्वरित ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध व्हावी अशी मागणी केली. त्याला प्रतिसाद देत ऑक्सिजन यंत्रणेची व्यवस्था डोम दिवसात होईल असे डॉ चव्हाण यांनी सांगितले.गुरुवारी डॉ एन.एस.चव्हाण यांनी कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर न्हावी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
व तेथील डॉक्टरांशी सोईसुविधे बाबत चौकशी केली.यावेळी त्यांनी न्हावी येथील रुग्णालयाच्या रूग्णांना मिळणाऱ्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जे.टी. महाजन महाविद्यालयाच्या जुन्या वस्ती गृहात सुरू होणाऱ्या 50 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची पाहणी केली यावेळी आ शिरीष चौधरी, प्रांताधिकार कैलास कडलग, तहसिलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी निलेश पाटील, मंडळाधिकारी जे डी बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, डॉ शैलेंद्र खाचणे व संजू राजपूत यांची उपस्थिती होती.
यावेळी चव्हाण यांनी माहिती देतांना सांगितले की रेमडीसीविर इंजेक्शन चा पुरवठा पुढील आठवड्या पासून सुरळीत होईल असे सांगत रूग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टराच्या सुचने नुसारच औषधउपचार करावे असे आवाहन केले.