जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तिघ्रे येथे अमली पदार्थ विक्री प्रकरणातील नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या संशयितांनी जळगाव जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला न्यायालयाने फेटालून लावला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तिघ्रे येथे १ कोटी ६ लाख ७९ हजार ४४० रुपये किमतीचा साधारण आठ क्विंटल वजनाचा गांजा विक्री होत असल्याच्या माहितीवरुन नशिराबाद पोलिसांनी तेथे धाड टाकली होती. तेथे राहुल काशिनाथ सूर्यवंशी हा पकडला गेला होता तर उर्वरित पाच जण पळून गेले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यामध्ये ५ जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यात राहुल काशिनाथ सूर्यवंशी यास अटक असून उर्वरित पाच जणांना अटक झालेली नाही. या पाच संशयितापैकी मनोज रोहिदास जाधव, सोमनाथ मानसिंग मोहिते (दोघे रा. अबोला ता. रावेर), रावसाहेब सुकलाल मोहिते (रा. भालगाव ता. एरंडोल) यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. जळगाव जिल्हा न्या. एस.व्ही. केंद्रे यांनी सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अटकपुर्व जामीननामंजूर केला. प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.