जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी नदी जवळ असलेल्या सर्वे क्रमांक ७८ ब मधिल साईचंद्र नगरात रविवार २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या स्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी इतर घरांना तडे गेल्या नाहीत ना याची खात्री करून घेतली. इमारत पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून सर्व नियमाप्रमाणे बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र मिळते. ते एनओसी या बिल्डरने घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
भुसावळ शहरात अजुन किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या, त्यानुसार नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, परवेश शेख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाला तीन महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यात या सर्व भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, त्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्यात आली आली आहे. इथल्या मातीचे परीक्षण करून घेण्यास सांगितले, त्याप्रमाणे संबंधितांना पत्र पाठवण्याची कार्यवाही सुरु आहे. ही इमारत बांधणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाला नोटीस पाठवावी असे सांगितले होते. त्यासंदर्भात आजच नगरपालिकेने बांधकाम व्यवसायिकाला नोटीस दिली असल्याचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले. या भागात कलम 163 लागू केले आहे. अजून तिथले तीन घरे पडण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या लोकांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.