जळगाव प्रतिनिधी) जनलोकपाल नियूक्ती, शेतकरी संरक्षण कायदा अंमलात आणावा, या करीता अण्णा हजारेप्रणित संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्त्यांनी सहभागी होत निदर्शने व धरणेआदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गोवाळीकर यांना निवेदन देखील देण्यात आले.
या संदर्भात अधिक असे की, लोकआयूक्त नियूक्ती तसेच शेतकरी संरक्षण कायदा अंमलात आणावा, या करीता अण्णाहजारे प्रणित संघटनेने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणाला जळगाव जिल्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठींबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणेआंदोलन केले. यावेळी उल्हास साबळे, विजय पाटील, लतीफ गयास शेख,सुरेश पाटील, गोरख पाटील, सुरेश मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.