स्वराज्य निर्माण सेनेची मुख्यमंत्र्यांकडे ‘शिववंदना’ उपक्रमास राज्यस्तरावर मान्यतेची मागणी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 07 07 at 1.51.44 PM

जळगाव (प्रतिनिधी ) :  आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात आगमन झाले असता त्यांना स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्रच्या वतीने जळगाव विमानतळावर मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाबाबत अभिनंदन करण्यात येऊन ‘शिववंदना’ उपक्रमास राज्यस्तरावर मान्यतेची मागणी करण्यात आली.

 

स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्रतर्फे मागील ७ वर्षांपासून अखंडपणे ‘शिववंदना’ उपक्रम राबवित येत आहे. हा उपक्रम जलगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ८२ हुन अधिक गावात छत्रपती शिवाजी महाराज यांना सामुहिक मानवंदना म्हणजे शिववंदना या कार्यक्रमाच्या माध्यामातून देव, देश, धर्म, कार्य बळकट करण्यास मदत होत आहे. तरी या कार्यास राज्य स्तरावर मान्यता मिळावी, शासनातर्फे जनजागृती करावी आदी मांगण्याचेही निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आली आहे. तसेच सेनेच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content