भाजपाच्या चाणक्यनीतीमुळेच रोहिणी खडसेंचा पराभव ; भुजबळ यांचा खळबळजनक आरोप

Bhujbal Recounts d

 

नशिक (वृत्तसंस्था) भाजप नेते एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसेंचा पराभव करण्यामागे भाजपाची चाणक्यनीती आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

 

 

विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. त्यात सर्वात महत्वाचे नाव म्हणजे एकनाथराव खडसे यांची कन्या यांची कन्या रोहिणी खडसे हे होते. त्यांनी जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला. या पराभवामागे भाजपाची चाणक्यनीती आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. तूर्तास तरी छगन भुजबळ यांच्या आरोपावर भाजपा काही उत्तर देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content