जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वाघरी येथील प्रकाश फुलचंद माहोर (वय-44) या शेतकऱ्याकडे तीन एकर शेत असून यावर्षी आधी कोरडा दुष्काळ व नंतर सततधार पावसामुळे हाताशी आलेले पीक वाया गेले, शेतकरी प्रकाश फुलचंद माहोर यांच्याकडे एकूण अडीच ते तीन लाख रुपये कर्ज होते, ते कसे फेडावे असा संकटाचा डोंगर समोर दिसत असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रकाश माहोर यांनी त्यांच्या शेतात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांची प्रतिकृती चिंता जनक असल्यामुळे त्यांना जळगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अखेर आज दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे