खिरोदा येथे कर्मयोगी स्व.दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांची पुण्यतिथी संपन्न

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  खिरोदा येथे हुतात्मा चौकात कर्मयोगी दादासाहेबांना  मा .आमदार शिरीषदादा चौधरी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.

या निमित्त प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. .शिरिष चौधरींनी या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना कर्मयोगी दादासाहेब चौधरी यांच्या कार्याची माहिती दिली. दादासाहेबांनी आपले संपुर्ण जीवन स्वातंत्र्यासाठी वाहून दिले होते. त्याग समर्पणचे ते एक मुर्तीमंत उदाहरण होते . आदिवासींचे जीवन कसे समृध्द होईल या दृष्टीकोनातून त्यांनी अनेक प्रयत्न केले .शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे विचार त्याकाळी दादासाहेबांचे होते.  हा सुध्दा दृष्टीकोन दादासाहेबांचा होता. दादासाहेबांचे विचार घराघरात पोहचावेत असे आवाहन या प्रसंगी शिरीषदादा यांनी केली तसेच यापुढे विद्यार्थ्यांना शेती विषय हा सुद्धा शिक्षकांनी शिकवावा व सेंद्रीय युक्त शेती व नवनविन प्रयोग करून शेती समृध्द करावी.

या प्रसंगी लोहारा गावातील लोकसेवक मधुकरराव चौधरी आश्रमशाळा येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सुत कातून कर्मयोगी दादासाहेबांना श्रध्दांजली अर्पण केली. जनता शिक्षण मंडळाचे संस्थाध्यक्ष कुमारदादा चौधरी, संस्था सचिव प्रभातदादा चौधरी, युवानेते धनंजय दादा चौधरी, न्हावी गावाचे सरपंच चोपडे , सुनिल फिरके, अनिल महाजन, चिनावलचे माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे, ज्येष्ठ पत्रकार उज्जेनकर, प्रल्हाद बोंडे, डॉ सुधाकर चौधरी, मनोज चौधरी, डिगंबर चौधरी, भरत चौधरी, पंचक्रोशितील मान्यवर व्यक्ती, ग्रामस्थ, सर्व शाखाप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व मधुस्नेह परिवारातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content