पाळधीकरांना पडली जीपीएस मंडळाच्या नवरात्रोत्सवाची भुरळ

 

गरबा दांडिया प्रेमी यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.!

पाळधी ता.धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।नवरात्रौत्सव सुरू आहे. नवरात्रात नऊ दिवस दुर्गा पूजनाला महत्व देण्यात आले आहे. तसेच, नवरात्रीत गरबा दांडीया आणि सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत केले जातात असतात. अश्यातच पाळधी येथील जीपीएस मित्र मंडळाच्या वतीने पाळधीत पहिल्यांदाच म्हणजे मंडळाच्या पहिल्याच वर्षी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.

याठिकाणी मंडळाच्या वतीने परिसरातील मुले,मुली, महिला, पुरुष यांचा करिता मोफत गरबा दांडिया प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये एकूण ५०० ते ६०० स्पर्धकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला होता. प्रशिक्षण दिल्या नंतर त्यांना ओळखपत्र क्रमांक देण्यात आले.

जळगांव येथील प्रसिद्ध ऑर्कीश्टा चे आकर्षण सुंदर असे मैदानाचे सजावट असलेल्या ठिकाणी पाळधीकर शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून अतिशय तल्लीन होऊन आपला नवरात्र उत्सव साजरा करतांना दिसत आहे. याठिकाणी रोज टीव्ही, स्मार्ट वॉच, मोबाईल, नव नवीन बक्षीस दिले जात असतात. विजेते निवडण्यासाठी एक समिती गठीत केली असून या समितीच्या माध्यमातून रोजचे तीन स्पर्धकांना हे बक्षीस दिले जात असते यामुळे बक्षीस जिंकण्यासाठी देखील मुली व महिलांमध्ये एक जोरदार स्पर्धा होत असते.

सदर मंडळाचे एक गुणवैशिष्ट्य असे की या मंडळात कोणीही अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष असे कोणीही नाही ८० च्या वर सभासद संख्या असलेल्या या मंडळात सर्व निर्णय हे एकमताने होत असतात जिल्हा परीषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शन व सहकार्याने मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. याचं मंडळाने गणपती मध्ये देखील श्री पशुपतिनाथ महादेव मंदिर नेपाल याचा देखावा आयोजित आयोजित केला होता.

Protected Content