जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या ५० वर्षापासून जामनेर शहरांमध्ये रावण दहनाची परंपरा असून उद्या मंगळवारी दसरानिमित्त हरातील दसरा मैदानावर ५१ फुटी रावणाचे दहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्याहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर रंगीबेरगी बिरंगी फटाक्याची आतिशबाजी होणार असूनहे रावण दहन श्रीराम मित्र मंडळ श्रीराम पेठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापासून उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर व मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी महिनाभरापासून रात्रंदिवस श्रीराम पेठ मित्र मंडळ परिश्रम घेऊन ती पूर्ण केली असून रावण दहनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.