गोंदिया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गोंदिया जिल्हा न्यायालयाने सूर्यटोला जळीत कांडातील आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी आरोपीर दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे. आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री पत्नी, मुलगा आणि सासऱ्याला जिवंत जाळले होते. कॉन्फरमेशन करिता हायकोर्टात जाणार असुन तिथुन ही सजा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे. आरोपी किशोर शेंडे हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करायचा, त्याच्या अत्याचाराला कंटाळून ती गेल्या एक वर्षापासून गोंदियातील सूर्यटोला येथे आपल्या मुलासोबत तिच्या माहेरी राहत होती. आरतीही गोंदियातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती.
संपूर्ण प्रकरण असे होते की, गोंदिया जिल्ह्यातील सूर्याटोला येथे माहेरी आलेल्या पत्नी, ५ वर्षीय मुलगा आणि सासर्याला तिरोडा येथील आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री येऊन जिवंत जाळले होते. ही घटना १४ फेब्रुवारी २०२३ ला घडली होती. या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते. अखेर या प्रकरणी आज ९ मे २०२४ ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलाने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ते ९० टक्के भाजले होते. घटनेनंतर तात्काळ रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलाचीही मृत्यू झाला. त्यानंतर जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर गंभीर असल्याने तिला उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. या घटनेत पोलिसांनी प्राथमिकरित्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून फरार जावई किशोर शेंडे याच्या अटकेसाठी शोध सुरू केला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान गंभीर भाजलेल्या अवस्थेतही पीडिता आरती शेंडेने पती किशोर शेंडे याने त्यांच्या झोपडीला आग लावल्याचं जबाबात सांगितलं होते. आज ९ मे रोजी सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी यांनी याप्रकरणी निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली आहे.