१० मे पासून केदारनाथ मंदिराचे दरवाजे खुले होणार

देहरादून-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे १० मे पासून खुले होणार आहे. मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बाबा केदारनाथ धामचे दरवाजे १० मे रोजी सकाळी ७ वाजेपाासून उघडण्यात येतील. देशविदेशातून भाविक यासाठी दाखल होत आहेत. बाबा केदारनाथ मंदिर बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून दर्शनासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. यावेळी केदारनाथचे कपाट खुलण्याची सर्वतोपरी तयारी सुरु आहे. सकाळी पहाटे मंत्रोच्चारामध्ये या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, त्यानंतर केदारनाथ धाम भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल.

१० मे २०२४ पासून ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुले असेल. मंदिर समितीकडून भाविकांसाठी कडक ड्रेसकोड लागू नाही. मात्र, मर्यादित कपडे घालण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास, रिल बनवण्यास किंवा कोणताही व्हिडीओ शूट करण्यास मनाई आहे. गेल्या वर्षी काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धामचे कपाट खुलण्यासंदर्भात माहिती दिली आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ज्या दिवशी चार धामांचे दरवाजे उघडतील, त्या दिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल. भाविकांची चार धाम यात्रा अधिक चांगली करण्याची सरकारची जबाबदारी आहे.

Protected Content