बांधकाम ठेकेदारानेच चोरली पाण्याची मोटार अन् लोखंड सळ्या

चाळीसगाव प्रतिनिधी । घरकुल योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घराचे बांधकाम सुरू असताना चक्क ठेकेदारांनी पाण्याची मोटार व लोखंडी सळ्या चोरून नेल्याची घटना शहरातील मिलिंद नगर परिसरात घडली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात ठेकेदार विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, नेहा किसन राठोड (वय-४७ रा. सुयेश लॉन्स जवळ हिरापूर रोड) चाळीसगाव आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. नेहा राठोड ह्या शिक्षीका असून आपल्या घरातच गिता पाटशाळा चालवून  उदरनिर्वाह करीत असतात. आईच्या नावे शहरातील मिलिंद नगर परिसरात बक्कळ जागा पडून होते. घरकुल मंजूर झाल्याने पडीक जमीनीवर घर बांधण्यासाठी मंगेश आण्णा कुमावत ( रा. बेलदारवाडी ) ता. चाळीसगाव यांच्याशी २२ आक्टोंबर २०२० रोजी करारनामा करून पन्नास हजार रुपये दिले असता.

दोन महिन्यांत घर बांधून देईल असे कुमावत यांनी सांगितले होते. परंतु खूप संत गतीने बांधकाम सुरू होता. दरम्यान घरबांधणीला पाण्याच्या मोटारींची गरज भासल्यानंतर नेहा राठोड यांनी आपल्या घरातील पाण्याची मोटार दिली. परंतु २२ डिसेंबर २०२० रोजी बांधकाम ठिकाणाहून वाचमॅनचा फोन आला की, गोडाऊचा कुलूप तोडून कोणीतरी पाण्याची मोटार चोरून नेली आहे. यावर नेहा राठोड ह्या पाहाणी केली असता पाण्याची मोटार दिसून आली नाही. त्यानंतर नेहा राठोड ह्या वैद्यकीय उपचारासाठी दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी पुणे येथे गेले तेव्हा घराचा कामही बंदच होता. दरम्यान दि.१७ मार्च रोजी नेहा राठोड घरी परतल्यावर बांधकामांच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेल्या असता. तेथील वाचमॅन व शेजारच्यांनी तुमच्या पाण्याची मोटार व लोखंडी सळ्या ठेकेदार कुमावत घेऊन गेला असल्याचे सांगिण्यात आले. तसेच ठेकेदार कुमावत यांनी नेहा याला फोन करून तुझ्या घराचा बांधकाम कोण करते. त्याची टांगेच तोडतो अशी धमकी दिली. त्यामुळे नेहा राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content