रणरणत्या उन्हात भुकेल्यांची भुक कॉग्रेस ने भागवली, निमित्त ठरले स्व. राजीव गांधी पुण्यतिथी

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील कॉग्रेस व महिला कॉग्रेस सह जळगाव जिल्हा सोशल मीडिया च्या माध्यमातून स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कॉग्रेस चे पदाधिकारी यांनी गोर – गरिबांना रणरणत्या उन्हात अन्नदानाचे पाकीट घेऊन वाटप करण्यात आले आहे. यात सुरवातीला स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस इरफान मनियार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अॅड. मनिषा पवार, तालुका अध्यक्ष कुसुम पाटील, शीला सुर्यवंशी, सोशल मीडियाचे राहुल शिंदे, कल्पेश येवले, गजेंद्र पाटील, गणेश पाटील, शिवाजी पाटील, बबलु ढाकरे, सोनु पुजारी आदी उपस्थित होते.

यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या संगणक युगामुळे विद्यार्थींसह परदेशातील कामे कोरोना काळात ऑनलाईन संगणकावर करण्यात आले. त्यांचे योगदान देश कधीच विसरणार नाही. यानंतर पाचोरा कॉग्रेससह महीला कॉग्रेस, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या आवारात काही गरजुंना अन्य दानाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरातील स्टेशन रोड परिसर, भडगाव रोड परिसरातील गरजुंना त्याच्यांपर्यंत जावुन जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले. यावेळी गरजुंनी पाकीट मिळाल्यावर लागलीच जेवण केल्याचे कॉग्रेस पदाधिकारींना दिसुन आले. तेव्हा पदाधिकारींच्या डोळ्यात अश्रू आले. पाचोरा कॉग्रेस ने प्रत्येक कार्यक्रमात अन्नदानाचा सहभागाचा संकल्प केला आहे.

Protected Content