नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने लोकसभा २०२४ च्या तारखा घोषित केल्या. यंदा देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार बराच पैसा प्रचारासाठी खर्च करत असतात. त्यावर निवडणूक आयोगाने मुभा आणली आहे. निवडणूकीत निष्पक्षता कायम राखण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला निवडणूकीच्या दरम्यान कमाल खर्च मर्यादा निश्चित केली आहे.
यंदा निवडणूक लढविणारा छोट्या राज्यातील कोणताही उमेदवार ७५ लाख आणि मोठया राज्यातील उमेदवार ९५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करु शकणार नाही. तर ज्या राज्यात विधानसभा निवडणूका आहेत तेथील उमेदवार ४० लाखापर्यंत खर्च करू शकतात. यात चहापासून ते बैठका, रॅली, सभा आणि जाहीराती, पोस्टर, वाहनांचा खर्च समावेश केला जाईल. त्यामुळे निवडणूकीत पैशांचा पुर रोखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या खर्चाची मोजणी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लागलीच सरु होते.
उमेदवार अर्ज भरल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने डायरीत हा खर्च लिहून ठेवायचा असतो. निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर या खर्चाचा लेखाजोखा आयोगाला सादर करावा लागतो.निवडणूक लढणारा उमेदवार आपल्या मनमर्जीनूसार सेवा किंवा वस्तूंचा खर्च लिहू शकत नाही. यासाठी देखील आयोग किमान दर जाहीर करते. ग्रामीण भागात कार्यालयाचे मासिक भाडे पाच हजार तर शहरी भागात तेच भाडे दहा हजार निश्चित केले जाते. एका चहाचा दर किमान आठ रुपये, एका समोशाचा दर किमान 10 रुपये ठरविला जातो. बिस्कीटे, मिठाई, भजी, पासून जिलेबीची किंमत निश्चित केली जाते. जर एखाद्याने प्रसिद्ध गायकाला बोलावले तर त्याची फि दोन लाख रुपये लावली जाते. जर ज्यादा खर्च आला तर असली बिल देखील लावण्याची तरतूद असते.