जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ परिसरातील चौघुले प्लॉट परिसरात रहिवासी असलेल्या लघुलेखकाच्या घरात सोमवारी मध्यरात्री घरफोडी केल्याची घटना उघडकीला आली. अज्ञात चोरट्यांनी रोकडसह ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लघुलेखक महेश शांताराम पाटील आई, वडील, पत्नी व मुलीसह चौघुले प्लॉट परिसरातील हनुमानमंदिराजवळ वास्तव्यास आहे. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबियांनी सोबत जेवण केले. त्यानंतर ते रात्री उशिरा त्यांच्या घराचे मेनगेटला साळखीदंड व कुलूप लावले. त्यानतर आतील दरवाजा व जिन्याच्या लोखंडी दरवाज्याला कुलूप लावून ते वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. रविवारी मध्यरात्री १२.३० ते ४.४५ वाजेच्या सुमारास चोरट्यानी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे व आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कुलूप शेजारी असलेल्या गटातीत फेकून दिली.
चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर महेश यांच्या पॅन्टच्या खिशातून ५ हजार त्यांच्या वडीलांच्या पँन्टमधून ३ हजार ५००, कपाटातील त्यांच्या आईच्या पर्समधील ६ हजार तर महेश यांच्या पत्नीच्या पर्समधील २ हजार ५०० अशी रोख रक्कम चोरट्यांन लंपास केली. तसेच घरातील लोखंडी कपाट व लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यत करीत चोरटे त्याठिकाणाहून पसार झाले. याप्रकरणी सोमवारी ५ एप्रिल रोजी रात्री उशीरा चोरट्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि खेमराज परदेशी हे करीत आहे.