जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे नियुक्तीच्या ठिकाणी राहणार्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांचे जयकिसनवाडीतील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्याघरातून सुमारे २ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणुन नोकरीला असलेल्या वषार्र् श्रीराम सोनवणे यांचे जयकिसनवाडी परिसरात घर आहे. याठिकाणी त्या मुलगा व मुलीसोबत वास्त्यावस आहे. त्यांची नियुक्ती पाचोर्याला असल्याने त्या दररोज रेल्वेने ये-जा करीत होत्या. परंतु गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने वर्षा सोनवणे या ५ जुलै पासुन पाचोरा येथे रुम करुन राहत असून त्यांचे जळगावातील घर बंद होते. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहार्या संजय जाधव यांनी त्यांना तुमच्या घराचे कुलूप आणि कडीकोयंडा तुटलेला असल्याची माहिती दिली.
चोरट्यानी वर्षा सोनवणेंच्या घरातून ५० हजार रुपये रोख, ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, १ हजार २०० रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या (६० ग्रॅमच्या १९७७ साली बनविलेल्या), ३२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्साची चीप, ७०० रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस असा एकूण २ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.