पाचोरा प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात तरूणाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोबारा केला आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कैलास सुरेशकुमार कुकरेजा (वय-३४) रा. सिंधी कॉलनी पाचोरा, हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान कैलास कुकरेजा हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. आज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनीटात घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ३ लाख ८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लांबविले. याप्रकरणी कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहे.