चोपडा येथे बंद घर फोडले; लॅपटॉपसह दागिने लांबविले

चोपडा प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद नगरातील यश पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५४ हजार रूपये किंमतीचे लॅपटॉप, सोन्याचे आणि चांदीचे दागीने चोरीस नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, निखील विनायक पाटील (वय-२१) रा. विवेकानंद नगर यश पार्क हा तरूण आपल्या कुटुंबियासह राहतो. २१ ऑक्टोबरी रोजी सायंकाळी ५ वाजता ते घराला कुलूप लावून बाहेरगावी कामाच्या निमित्ताने गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लॅपटॉप, सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकुण ५४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. निखील पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विनोद पाटील करीत आहे.

 

Protected Content