अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावातील एका भागात १० वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावातील एका भागात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पिडीत मुलगी ही घरात तिच्या लहान भावाला झोका देत असतांना गावातील राहणारा भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे यांने पिडीत मुलीसोबत अश्लिल चाळे केले. हा प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीची आई ही त्यांच्या घरी जावून जाब विचारला असता पिडीत मुलीच्या आईला प्रशांत अशोक बोरसे, उषाबाई अशोक बोरसे आणि अशोक बोरसे या तिघांनी मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी महिलेने मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रशांत अशोक बोरसे, उषाबाई अशोक बोरसे आणि अशोक बोरसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल बोरकर हे करीत आहे.