Home Uncategorized पारोळा येथे “लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय” च्या जयघोषात रथोत्सवास...

पारोळा येथे “लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय” च्या जयघोषात रथोत्सवास प्रारंभ


पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्याचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराजांच्या रथाला मोठ्या उत्सहात प्रारंभ झाला आहे. मागील ३८६ वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. बालाजी महाराजांचा रथोत्सव आज शुक्रवारी (३ अक्टोंबर) रोजी या मोठ्या भक्तिभावाने रथोत्सवास प्रारंभ झाला आहे. हा रथोत्सव म्हणजेच या संपूर्ण ब्रम्होत्सावातील पर्वणी असते. हा रथोत्सव पाहाण्यासाठी देशातील विविध भागातून भाविक भक्त हजेरी लावतात.

देशातील सर्वात मोठा ४५ फुट उंचीचा हा रथ म्हणून या श्रींचा रथाची ओळख असुन जवळपास दिड टन वजनाचा हा रथ संपूर्ण सागवानी लाकडीने बनविण्यात आला आहे. या संपूर्ण रथावर आकर्षक अशी आखिव रेखीव देव देवतांची चित्रे आहेत. तसेच हा भला मोठा श्रींचा रथ कोणत्याही यंत्रा विना भाविकांकडुन एका मोठ्या व जाड दोरीच्या सहाय्याने “लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज कि जय”  जयघोषात ओढला जातो.

या वेळी श्रीं च्यां रथावर विविध प्रकारच्या फुलांनी व विद्युत रोषणाई ने सजविण्यात येते तसेच रथोत्सव यात्रा सुरू होते. त्यावेळी रथा समोर शहरातील विविध मंडळाचे १२ व 3 व्यायाम शाळेचे लेझीम पथक, बँड, ढोल ताशे, तसेच महिला मंडळाचे लेझीम पथकांचे नृत्य हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. याच दिवशी तिरूपतीच्या धर्तीवर शहरात कल्याण कट्टा उभारण्यात येतो.

या दिवशी अनेक भाविक हे आपले केश दान करण्यासाठी येथे व नवस फेडण्यासाठी येत असतात व आपले केश दान करीत असतात. या दिवशी संपूर्ण परिसर हा भक्तीचा सागरात न्हावुन निघत असतो. सकाळी रथचौकातुन विधीवत पूजा करून मोठ्या भक्तिभावाने हा श्रींचा रथ मार्गक्रमण करीत आझाद चौक, झपाट भवानी चौक, राममंदिर मार्गान रात्री उशिरा आपल्या नियोजित ठिकाणी येत असतो.

याप्रसंगी शहरात यात्रा भरत असते. य यायात्रेत विविध प्रकारच्या वस्तू, पाळणे, लहान मुलांच्या खेळण्यांचे विक्रेते इथे येत आपापली दुकाने थाटतात. तसेच विविध खाद्यपदार्थाची देखील रेलचेल असते. या श्रींच्या ब्रम्हौत्सवाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी शांततेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पारोळा पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या रथोत्सव विविध मंडळाकडून महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound