Home राजकीय अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही – संजय राऊत

अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही – संजय राऊत


images 1537252983670 239470 sanjay raut

मुंबई (प्रतिनिधी) पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कामगिरीबद्दल वायुसेनेचे अभिनंदन करतानाच, जैशच्या सैतान अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मद चा सैतान अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही,असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. दरम्यान,१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं ‘जैश-ए-मोहम्मद’नं सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ही इच्छा आज वायुसेनेने पूर्ण केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound