पारोळा, प्रतिनिधी । केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे ती बंदी त्वरित उठवावी अशा मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेतर्फ तहसीलदारांना देण्यात आले.
केन्द्र सरकारने शेतकऱ्यांना कांदाचा चांगला भाव मिळत असतांना अचानक कांदा निर्यात बंदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव हे कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी ही शेतकरी हित विरोधी निर्णय आहे. ती बंदी तात्काळ उठवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आज बुधवार रोजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शक सूचना व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेनेच्यावतीने रॅली काढून तहसीदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, युवासेना शहर प्रमुख आबा महाजन, युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी, जि. प. सदस्य हर्षल माने, माजी उपसभापती मधुकर पाटील, शेतकरी संघ उपाध्यक्ष भिकन महाजन, प्रा. बी. एन. पाटील, माजी सरपंच सखाराम चौधरी, माजी नगरसेवक राजू कासार, महिला तालुका संघटिका उर्मिला भोसले, महिला शहर संघटिका जयश्री दिलीप चौधरी, महिला उपशहर संघटिका कविता शिंपी, संघटिका तालुका उपाध्यक्ष पुजा एकनाथ पाटील, संघटिका गायत्री भैया महाजन, मयुरी पाटील,उप सभापती डॉ. पी. के. पाटील, चेतन पाटील, उप सरपंच अमोल पाटील, मनोज चौधरी, दिलीप चौधरी, मयुर मराठे, अरुण चौधरी सिद्धार्थ जावळे, गणेश मोरे, शुभम बोरसे, भैय्या महाजन, योगेश लोहार इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.