केद्रींय समितीने घेतली ‘पीएम केअर्स’च्या व्हेन्टिलेटरची माहिती

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पीएम केअर्स मधून प्राप्त व्हेन्टिलेटरचा सर्व्हे करण्यासाठी केंद्रीय समितीने शुक्रवार २ जुलै रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी व्हेन्टिलेटरविषयी माहिती जाणून घेतली.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावला पीएम केअर्स मधून ९५ व्हेन्टिलेटर्स प्राप्त झाले आहे. यात १५ व्हेन्टिलेटर्स हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला उसनवारी तत्वावर देण्यात आले आहे. उर्वरित ८० व्हेन्टिलेटर्सची माहिती समितीने महाविद्यालय व रुग्णालयाचे व्हेन्टिलेटर्स नियंत्रण् समिती अध्यक्ष तथा प्र.प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांच्याकडून जाणून घेतली. 

समितीमध्ये एम्स संस्था, भोपाळ येथील डॉ. थॉमस फ्रान्सिस, मुंबई येथील औषध निरीक्षक रोशन लाल मिना, नाशिक येथील डीपीसी संस्थेची रवी आव्हाड, नाशिक येथील ज्योती सीएनसी ऑटोमेशन संस्थेचे विक्रम साळी, बीईएल इंजिनिअर, बंगलौर संस्थेचे मनिषकुमार तिवारी यांचा समावेश् होता. त्यांनी व्हेन्टिलेटर्स किती सेवा देतात, त्यांची सद्रयस्थिती काय, तसेच व्हेन्टिलेटर्सच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. डॉ. सुरवाडे यांनी त्यांना व्हेन्टिलेटर्सची कार्यक्षमता आणि सेवा याबाबत आकडेवारीनुसार माहिती दिली.

समितीने अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. डॉ.रामानंद यांनी त्यांना रुग्णालयाविषयी माहिती देत व्हेन्टिलेटर्सबाबत सांगितले. यावेळी कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेत व्हेन्टिलेटर्सचा रुग्णांना कसा लाभ झाला व कोरोना महामारीची सद्रयस्थिती याविषयी अवगत केले. यावेळी समितीने रुग्णायातील नियोजन आणि व्यवस्थापन याची माहिती घेवून समाधान व्यक्त केले.

 

 

Protected Content